दोन सूर्यांची भेट

दोन सूर्यांची भेट

commonmanclick चा  पहिलाच post आहे. कुठून सुरुवात करावी बरे? माझ्या देवापासून सुरुवात करावी.रायगडला महाराजांच्या दर्शनासाठी गेलो होतो.पहाट होती.एका सूर्याचे दर्शन घ्यायला दुसरा सूर्य येत होता.मला तो क्षण क्लीच्क करायचा होता पण professional कॅमेराचा प्रश्न होता. कोठून आणावा बरे कॅमेरा? शेवटी महाराजांची शिकवण उपयोगास आली.जेवढे आहे त्यातूनच निर्मिती करायची.जेवढे साधन उपलब्ध आहे त्यातूनच जेवढे चांगले घडवता येईल तेवढे चांगले घडवायचे.Mobile ला कॅमेरा आहे.बस्स ठरले यातूनच एक आठवण click करायची.दोन सूर्यांची भेट कॅमेरा मध्ये साठवायची.फोटो घेताना असे वाटत होते की खुद्द स्वतः आकाशाचा स्वामीच या धरतीच्या स्वामीचे तेज बनला आहे.आणि commonmanclick साठी पहिला post या दोन सूर्याचे दर्शन घेवून करायचा.

Advertisements