सूर्य आणि दिवेआगर बीच

सूर्य आणि दिवेआगर बीच

सायंकाळी 5 च्या सुमारास दिवेआगार बीचवर घेतलेला हा फोटो आहे.तळपत असलेला सूर्य आहे,समुद्र आहे,पाऊल ठसे आहेत आणि घोडागाडीच्या चाकाचासुद्धा ठसा आहे. जीवनसुद्धा असेच आहे ना ! जीवन समुद्र आहे,आशेचा सूर्य आकाशात तळपत आहे.पण आपण नेहमी जीवन समुद्रात पोहण्याचा आनंद न घेता किनार्यावरच ये जा करतो.काळ कधी आपले पाऊल ठसे मिटवेल सांगता येत नाही.आपली पावले नेहमी संभ्रमात असतात कि समुद्रात जावे का नको.आणि आपण किनार्यावरच थांबतो.सुख दुख तर येंतच असतात पण आपण का थांबायचे?मस्त समुद्रात पोहायचे.मग किती हि उन्हाचे चटके बसू देत.आशेचा सूर्य कवेत येत नाही म्हणून काय झाले तो दिसत तर आहे.

Advertisements