Home

निसर्ग आणि मानवी संगम

Leave a comment


संगम

संगम

आजच पाउस चालु झाला आणि मनात २ वर्षापुर्वीच्या आठवणी मनात जाग्या झाल्या. हां फोटो घेतला आहे सिंहगड किल्ल्यावरून. Nikon coolpix  ची Panaroma  functionality पहिल्यांदा वापरली.मला मुठा नदी, पुणे शहर आणि भरून आलेले ढग एकाच क्लिक मध्ये capture करायचे होते आणि Panaroma mazya मदतीला आला. अस वाटत आहे की घरांच्या नदीचा आणि मुठा नदीचा संगम होत आहे.मी या फोटोवर जास्त लिहुच शकत नहीं कारण निसर्गाने एवढे फोटोत भरून दिले आहे की कशावर किती आणि काय लिहावे तेच समजत नाही आहे. अशावेळेस फक्त फोटोचा आनंद घ्यायचा असतो आणि मनात आठवणी जाग्या करायच्या असतात…..

Advertisements

कारंजा, वृन्दावन गार्डन

Leave a comment


कारंजा, वृन्दावन गार्डन

कारंजा, वृन्दावन गार्डन

४ वर्षापुर्वीचा हा फोटो आहे. बंगलोरला रहात होतो. खुप दिवसापासून इच्छा होती कैमरा घ्यावा. पैसे जमवले, एकटाच रहात होतो.पैसे साठवले आणि भावाच्या लग्नाचे निमीत्त झाले आणि Nikon  Coolpix  कैमरा घेतला.मैसूरला गेलो,वृन्दावन गार्डन मध्ये. रात्रीचा flash मारून फोटो काढले आणि फोटो पाहिले. एवढे खराब फोटो आले होते.कधी कैमेराच handle  केला नव्हता. फक्त manual वाचून functionality  शिकून फोटो काढले होते. रात्रीचे ८ वाजले होते. ९ ला बाग़ बंद होते.खुप वाईट वाटत होते आणि स्वतावर राग पण येत होता.एका ठिकाणी स्थिर बसालो.उदास वाटत होते. आणि मनात आले जे उपलब्ध आहे त्यातून जो उत्तम देण्याचा प्रयत्न करतो तोच खरा कलाकार. मी कलाकार नाही आहे.पण मन जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत मी प्रयत्न सोडत नाही. थोडा कैमरा नीट पाहिला. shaalet शिकलेलो science चे rule apply  केले. काही कैमराचे मोड change केले. flash बंद केला.आणि just  क्लिक केले. आणि हा फोटो आला.मग काय नुसता हवेत तरंगत होवून फोटो काढत इकडे तिकडे पळत होतो. वेळ कमी होता ना…! आज ही मला त्या दिवशी शिकलेले साथ देते.फक्त या फोटोत जे तारीख आणि वेळ आहे ती हां फोटो ख़राब करते.बेसिक फोटोग्राफर कधीच तारीख आणि वेळ फोटोत दिसून देत नाही.मी काढलेल्या सगळ्या जुन्या फोटोत तारीख/वेळ आहे.पण आता मात्र मी कटाक्षाने तारीख/वेळ आणि flash  फोटो काढताना वापरत नाही.आज माझ्याकडे फक्त मोबाइल कैमरा आहे पण त्यातूनसुद्धा उत्तम फोटो काढायचा प्रयत्न करतो….बघुया किती उत्तम जमते ते. Professional कैमरा घ्यायचा विचार आहे पण नाही म्हणून काही हरकत नाही आहे. मोबाइल कैमरा तर आहे…..हां एक मात्र आहे मी आता कधीच Flash  वापरत नाही आणि तारीख/वेळ सुद्धा फोटोवर येवून देत नाही….. 🙂

रामटेक आणि क्षितिज

Leave a comment


रामटेक आणि क्षितिज

रामटेक आणि क्षितिज

कधीतरी वाटत आपणही असच क्षितिजात हरवून जाव…
असच वाटल होत रामटेकवरून  हे विहंगम दृश्य पहाताना…..

रामटेक आणि टेकडी

Leave a comment


रामटेक आणि टेकडी

रामटेक आणि टेकडी

रामटेकवरुन घेतलेला हा फोटो आहे.घरांची घाई आणि त्यात एकटीच असलेली टेकडी.आता तरी त्यावर थोडेच बांधकाम होत आहे भविष्याचे माहीत नाही….एकटीच लढत आहे मानवी आक्रमणाविरुद्ध…..रामाच्या मनात काय आहे कोण जाने…..

%d bloggers like this: