इंद्रायणी आणि अभंग

इंद्रायणी आणि अभंग

इंद्रायणी आणि अभंग

इंद्रायणी आणि अभंग

इंद्रायणी आणि अभंग

इंद्रायणी आणि अभंग

इंद्रायणी आणि अभंग

इंद्रायणी आणि अभंग

इंद्रायणी आणि अभंग

इंद्रायणी आणि अभंग

मला या फोटोंमध्ये नक्की काय पकडायचे आहे? आकाशी तळपणारा सूर्य, कि नदीवरचे तरंग आणि त्या तरंगावरती सूर्याने केलेली किरणांची पाखरण….? नाही मला त्या दिवशी वेगळेच काहीतरी capture करायचे होते.

हि तीच इंद्रायणी, जी तुकारामांची अभंग गाथा पोटात घेवून पावन झाली. हि तीच जागा जिथे तुकारामांनी सामान्यांची भंगलेली मने परत अभंग केली. जिथे एका विद्रोही कवीच्या १३ दिवसांच्या उपासानंतर इंद्रायणीने तिच्या काळजात जपून ठेवलेली गाथा त्याची त्याला परत केली….

तोच काळ, तीच वेळ, तसेच मनाची घालमेल करणारे वातावरण मला फोटोत आणायचे होते. आणि त्यासाठी black & white फोटोशिवाय मला दुसरा पर्यायाच दिसला नाही. हाच प्रयत्न मी फोटो काढते वेळेस केला. मला माहित नाही कि या प्रयत्नात मी कितपत यशस्वी झालो आहे….प्रयत्न तर केला आहे..शेवटी त्याचीच इच्छा, दुसरे काय…मी फक्त त्याची जादू कॅमेर्यात बंदिस्त करण्यासाठी धडपडणारा एक सामान्य माणूस,नुसते click करणारा एक common man…..

Advertisements