पत्थर दिल

पत्थर दिल

विरोध करताना कधी रागवायचं नसतं,
फक्त सीना तानके स्थिर उभं रहायचं असतं,
प्रवाहाबरोबर लढताना कधीतरी पत्थर दिल ही व्हावं लागतं,

किती खपले उडतील, किती तडाखे बसतील,याचे गणित मांडायचे नसते,
फायदा तोटा न बघता जिद्द कायम ठेवायची असते.
प्रवाहाबरोबर लढताना कधीतरी पत्थर दिल ही व्हावं लागतं,

मरण तर चुकायचं नाही,
मग लढायला घाबरायचं नाही,
प्रवाहाबरोबर लढताना कधीतरी पत्थर दिल ही व्हावं लागतं,

लढतो म्हणून या प्रवाहासारखे किरकिर करायचं नसतं,
शांत राहूनच आपला मार्ग रहायचं असतं,
प्रवाहाबरोबर लढताना कधीतरी पत्थर दिल ही व्हावं लागतं,

काय सांगावे कधी तरी प्रवाह हरेल आणि मी जिंकेन,
तोपर्यंत माझी मलाच साथ आहे,
प्रवाहाबरोबर लढताना कधीतरी पत्थर दिल ही व्हावं लागतं.

Advertisements