नागेश्वरा-चेन्नकेशवा मंदिर, मोसले (Digitally Altered)

नागेश्वरा-चेन्नकेशवा मंदिर, मोसले (Digitally Altered)

नागेश्वरा-चेन्नकेशवा मंदिर, मोसले (Original Image)

नागेश्वरा-चेन्नकेशवा मंदिर, मोसले (Original Image)

हे दिवस आहेत २००९ मधले, जेंव्हा मी माझा पहिला LG चा टच स्क्रीन मोबाइल घेतला. मोबाईलच्या कॅमेरयाची capacity होती फक्त 3 मेगा पिक्सल. याच कॅमेरयाने मोसले येथील नागेश्वरा-चेन्नकेशवा मंदिराचा फोटो घेतला.

होयसाळ स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना असलेले १२ व्या शतकातील हे नागेश्वरा-चेन्नकेशवा चे जुळे मंदिर आहे मोसले या हस्सन पासून १० किलोमीटरवर असलेल्या छोट्याश्या निसर्गसुंदर गावात.

दक्षिण भारतात खूप सारी अजोड मंदिरे आणि शिल्पकृती आहेत. इतकी अजोड की एक क्षण असे वाटते की आता यातील एखादी अप्सरा समोर येऊन नृत्‍य करू लागेल किंवा साक्षात शंकर आता तांडव करतील. मानव नावाचा प्राणी अशी मंदिरे बनवू शकतो असा विश्वास न बसण्याइतकी सजीव.

बेंगलोर मधले ते दिवसच मंतरलेले होते. ४ वेळेस फिरायला गेलो. ते ही कुठे तर एकाच जागी, तीच गाडी आणि तोच ड्राइवर ठरलेला असायचा. फक्त माझ्याबरोबरचे प्रवासी बदलले असायचे. माझा प्लॅन ठरलेला असायचा आणि माझ्या मनातील आतुरता वाढलेली असायची.नव्या जोषाने सकाळी निघायचे, गोमटेश्वराला बाहुबलीचे दर्शन घ्यायचे. तिथून सोमनाथपुर, मोसले,हस्सन, हाल्लेबीड , बेल्लुर आणि शेवटी म्हॆसुर करून परत मुक्कामी परत बेंगलोरला यायचे. एक ही ट्रिप बोअर नाही झाली. प्रत्येक ट्रिप मध्ये नवीन काही तरी मिळत होते. ही भूक कधीच मिटायची नाही. हा शिल्पांचा देखावा प्रत्येक वेळेस अजुन सजीव होऊन भेटत होता. अजुन बारकावे उलगडून दाखवत होता. बघू परत तशीच संधी कधी मिळते.

Advertisements