Home

हनुमान – तिकोना किल्ला

4 Comments


हनुमान - तिकोना किल्ला

हनुमान – तिकोना किल्ला

२०१५ चा पहिला पाऊस आम्ही अनुभवला तो तिकोन्यावर. निघालो होतो सिंहगडला. मग विचार बदलला.कारण थोडे जरी ढगाळ वातावरण झाले तर सिंहगडावर गर्दी होते. एकाने सांगितले होते कि हडशीला जा म्हणून. मग मी आणि बायको तिकडे निघालो. तिथे पोहोचलो तर कळाले कि तिकोना खूप जवळ आहे म्हणून. मग तिकोन्याला गेलो.खूप उशीर झाला होता.४ वाजले होते. खाली असलेल्या एका छोट्या टपरीवाल्याने  सांगितले कि किल्ला सोप्पा आहे चढायला आणि १ तासात पाहून होईल.पण पावसात थोडा निसरडा झाला होता.आणि काही लोक हि त्यावेळेस तिथे चढाई करत होते. बहुतेक मुंबईची असावीत.एक जोडपे होते पुण्याचे. मग आम्ही ही  धाडस केले.

वर गेल्यावर पहिले दर्शन घडले तर या हनुमानरायाचे. एवढी मोठी आणि जुनी मूर्ती ती पण हनुमानाची एका किल्ल्यावर मी प्रथमच पहात होतो. याला पहाताच मन प्रसन्न झाले. सहज एक विचार मनात आला कि काय नाते होते हनुमानरायाचे आणि रामाचे. नाते नसताना सुद्धा हा जर त्यांच्यासाठी लंकेला जावू शकतो, द्रोणागिरी उचलून आणू शकतो तर आपण कमीत कमी आपली नाती,आपली माणसे का सांभाळू शकत नाही……!

किल्ला उतरल्यानंतर त्याच टपरीवर खाल्लेली भजी, वडा पाव आणि चहा यांची चव अजून जिभेवर आणि पावसातला अनुभव अजून मनात रेंगाळत आहे. अचानक घडलेल्या या ट्रीप ने खूप वर्षाची तिकोण्यावर जाण्याची इच्छा पूर्ण झाली.

Advertisements

भुलेश्वर १

Leave a comment


भुलेश्वर

भुलेश्वर

हा फोटो पुण्या पासून ६० km वर असलेल्या भुलेश्वरचा आहे. कंपनीत सुट्टी नसल्यामुळे या वर्षी गावी जाता आले नाही. लक्ष्मी पूजनादिवशी सकाळी उठलो. घरी एकटाच होतो. Mobile पाहिला तर माझे नातेवाईक कमी आणि मित्र जास्त असलेले संजय सर यांचा WhatsApp पाहिला की काय करत आहेस म्हणून. मी एकटाच असल्याने दोघांनी मिळून बाहेर जाण्याचा प्लान केला. पहिल्यांदा तिकोना,मग थेऊर आणि शेवटी भुलेश्वरला जायचे आमचे नक्की झाले. माझ्या नवीन कॅमेर्याचा उपयोग करायला भुलेश्वर पेक्षा दुसरे चांगले ठिकाण पुण्यात तरी इतक्या जवळ नाही आहे.त्यांच्या Activa वर  आमचा प्रवास पार पडला. आम्ही गेलो तेंव्हा बिलकुल गर्दी न्हवती. मनसोक्त फोटो काढले.

मंदिरात आणि मंदिरा बाहेर खूप कमी मुर्त्या अशा आहेत की ज्यांचा चेहरा, हात-पाय मोघली छिन्नी-हाथोड्या पासून वाचल्या आहेत. त्यापैकी ही एक मूर्ती. मी archiologist नसल्याने मला नक्की या मूर्तीविषयी माहिती सांगता येणार नाही. पण या फोटोवर एका बाजूने जे ऊन येत होते त्याने मूर्तीला एक वेगळाच जिवंतपणा येत होता. तो capture करण्याचा प्रयत्न मी केला आणि मला वाटते तो पूर्णता जरी साध्य झाला नसला तरी थोडा फार परिणाम या फोटोत उतरला आहे.

येताना वाटेत एका झाडाला चिंचा लागल्या होत्या. त्या मस्त पैकी तोडून आम्ही खाल्या आणि उसाच्या एका शेतात दिवाळीचा फराळ्र  खाल्ला.

नवं साल

Leave a comment


नवं साल (Digitally Altered)

नवं साल (Digitally Altered)

नवं साल (Original Image)

नवं साल ((Original Image)

नवं साल साऱ्यांच्याच आयुष्यात येतो. फरक इतकाच काहींच्या आयुष्यात तो दर वर्षी येतो तर काहींसाठी जन्म हाच नवं साल असतो. माझ्यासाठी माझा जन्म हाच नवं साल आहे कारण दुसरा दिवस माझ्यासाठी नाही.
Wish you a Happy New Year My Lucky and Dear Friends.

Window

2 Comments


Window (Digitally Altered)

Window (Digitally Altered)

Window

Window (Original Image)

जानेवारी महिना जवळ आला कि मला नेहमी आठवते २०१२ ची रायगड ट्रीप. मी, श्रीदत्त आणि संतोष ने केलेली रायगडी मुक्कामी सहल. मस्त थंडी, रात्रीची गडावरची ती चांदण्या रात्रीतील शेकोटी, महालातील सफर, सूर्योदय, सूर्यास्त आणि खूप साऱ्या केलेल्या बाता. हीच ती ट्रीप होती जीने मला हा ब्लॉग लिहायला उद्युक्त केले. पाहूया अशी संधी परत कधी येते ते…..
हा snap ही तिथलाच…….

ही वाट कुठे जाते?

Leave a comment


ही वाट कुठे जाते? (Original Image)

ही वाट कुठे जाते? (Original Image)

ही वाट कुठे जाते? (This image is digitally altered.)

ही वाट कुठे जाते? (This image is digitally altered.)

29 जून 2014 रोजी काढलेला हा फोटो आहे. दुपारी 3 वाजता सुद्धा मनात धडकी भरविणारा सह्याद्री, गच्च भरलेले आकाश,मध्येच बरसणारा बेधुन्द पाऊस, आणि यात आम्हा सहाजणांचा थवा राजगडाच्या पायथ्याशी विहंगत होता. कुठूनही समजत नव्हते की नेमका राजगड कुठे आहे आणि किती दूर आहे. त्याने स्वताला ढगांच्या रजईत लपेटून घेतले होते. फक्त साथीला होती ती मरळलेली पायवाट. पुढे तिनेही साथ सोडली आणि आमचा प्रवास चालू झाला तो एका निसरड्या वाटेवरून.

या फोटोत दिसणारी लाल पाटी ही शेवटची खूण जिन्हे आमची वाट बरोबर असल्याची खात्री दिली. गावात एकाने सांगितले होते की वर खूप पाऊस आहे आणि जपून जा कारण वाट खूप निसरडी आहे. निसरडी वाट म्हणजे काय याचा अनुभव अजुन घ्यायचा होता. आणि या जंगलात घुसल्यावर समजनार होते की नुसतीच वाट निसरडी नाही आहे तर बरोबर आमच्या साथीला भरपुर डास आणि किडे ही असणार आहेत. पण माणूस नावाचा प्राणी आम्हाला पुढे कुठेच जाताना आणि गड उतरताना ही दिसणार नव्हता. तो दिसला फक्त गडावर आणि गावात. हाच क्षण होता की जिथे आम्ही शेवटचे फोटो सेशन केले. आणि जिथे आम्हाला आमचे मोबाइल नेटवर्क साथ सोडून गेले. कारण पुढे पावसाने आम्हाला तशी संधीच दिली नाही. बहुतेक त्याच्या मनात असावे की शिवकालीन लोक कसे राहात असतील आणि कसे लढत असतील हे आम्हाला समजावे ज्यानेकरून आम्ही नवी पिढी स्वराज्याचे मोल जांणू शकू. राजगड ही 22 वर्ष राजधानी का होती ते आज आम्हाला समजणार होते. त्याची  ही फक्त चुणूक होती. शेवटी विचार न करता एकदाचे घुसलो या हिरव्या काळ्या जंगलात, हो हे जंगल मध्येच काळे दिसत होते आणि सुरू झाला आमचा पुढचा थरार……!

निशाना

Leave a comment


निशाना (This image is digitally altered.)

निशाना (This image is digitally altered.)

निशाना

निशाना

निशाना

निशाना

जंजिर्याचा सिद्दी असाच आपला निशाना साधत असेल का…? असाच शत्रू त्याच्या तोफेच्या टप्प्यात येत असेल का….? होडीतल्या लोकांना थांगपत्ता ही नसेल कि आपल्यावर कोणी तरी नजर ठेवून आहे आणि आपण आपसूक त्याची शिकार होणार आहोत.

असाच निशाना एका प्रवासी बोटीवर मी माझ्या Nokia C6 -01  mobile कॅमेर्याने जंजिर्यावरून साधला.

Wallpaper – एका नावेचे शीड

Leave a comment


Wallpaper - एका नावेचे शीड

Wallpaper – एका नावेचे शीड

हा wallpaper आहे जंजिरा किल्ल्याकडे जाणार्‍या एका नावेच्या शिडाचा.

निळाईच्या पार्श्वभूमीवर थोडेसे पिवळसर झाक असलेले हे शीड वेगळाच feel देत होते. मन आवरले नाही आणि एक मस्त क्लिक मला भेटला.

Older Entries

%d bloggers like this: