Home

हनुमान – तिकोना किल्ला

4 Comments


हनुमान - तिकोना किल्ला

हनुमान – तिकोना किल्ला

२०१५ चा पहिला पाऊस आम्ही अनुभवला तो तिकोन्यावर. निघालो होतो सिंहगडला. मग विचार बदलला.कारण थोडे जरी ढगाळ वातावरण झाले तर सिंहगडावर गर्दी होते. एकाने सांगितले होते कि हडशीला जा म्हणून. मग मी आणि बायको तिकडे निघालो. तिथे पोहोचलो तर कळाले कि तिकोना खूप जवळ आहे म्हणून. मग तिकोन्याला गेलो.खूप उशीर झाला होता.४ वाजले होते. खाली असलेल्या एका छोट्या टपरीवाल्याने  सांगितले कि किल्ला सोप्पा आहे चढायला आणि १ तासात पाहून होईल.पण पावसात थोडा निसरडा झाला होता.आणि काही लोक हि त्यावेळेस तिथे चढाई करत होते. बहुतेक मुंबईची असावीत.एक जोडपे होते पुण्याचे. मग आम्ही ही  धाडस केले.

वर गेल्यावर पहिले दर्शन घडले तर या हनुमानरायाचे. एवढी मोठी आणि जुनी मूर्ती ती पण हनुमानाची एका किल्ल्यावर मी प्रथमच पहात होतो. याला पहाताच मन प्रसन्न झाले. सहज एक विचार मनात आला कि काय नाते होते हनुमानरायाचे आणि रामाचे. नाते नसताना सुद्धा हा जर त्यांच्यासाठी लंकेला जावू शकतो, द्रोणागिरी उचलून आणू शकतो तर आपण कमीत कमी आपली नाती,आपली माणसे का सांभाळू शकत नाही……!

किल्ला उतरल्यानंतर त्याच टपरीवर खाल्लेली भजी, वडा पाव आणि चहा यांची चव अजून जिभेवर आणि पावसातला अनुभव अजून मनात रेंगाळत आहे. अचानक घडलेल्या या ट्रीप ने खूप वर्षाची तिकोण्यावर जाण्याची इच्छा पूर्ण झाली.

Advertisements

पाऊलवाट

6 Comments


पाऊलवाट

पाऊलवाट

सिंहगड किल्ला.सप्टेंबरमधील एक धुंद संध्याकाळ. सोबत मी, माझी पत्नी आणि नुकतेच लग्न झालेला माझा चुलत भाऊ त्याच्या पत्नीबरोबर असे आम्ही चौघेजण मस्त रमत गमत, गरम कणीस खात इकडे तिकडे फिरत होतो. कुंद वातावरण, फुललेली अनेक रंगी फुले,वाहत असलेले झरे,कधी मध्येच येणारा पाऊस, तर कधी मधेच येणारे ढग, वातावरण अजून मस्त बनवत होते.

ढग काही सूर्याला बाहेर येवू देत न्हवते. आणि अशा मस्त वातावरणात आमचे फोटो काढण्याचे उद्योग चालूच होते. अशाच एका पाऊलवाटेवरून जात असताना सूर्य थोडासा आणि थोड्या क्षणासाठी बाहेर आला आणि अचानक मला त्याने हा सुंदर फोटो क्लिक करण्याचा अवसर दिला. माझे नशीब अजून जोरात होते ते यासाठी की एवढा प्रसिद्ध किल्ला आणि या जागी यावेळेस कोणीच न्हवते. प्लास्टिक किंवा पर्यटकांनी केलेला कचरासुद्धा न्हवता.त्यामुळे खूप कमी वेळ असूनसुद्धा मला हा फोटो क्लिक करता आला.

फोटो क्लिक केला आणि सूर्य परत ढगाआड  गेला. दुसरा फोटो क्लिक करण्याची त्याने संधी दिली नाही. खरच काही संधी एकदाच येतात. आपल्याला फक्त ती साधता यायला हवी आणि मी ती त्यावेळेस साधली.

एवढा मस्त नैसर्गिक प्रकाश होता की फोटोला digital alter करण्याची गरजच भासली नाही. आणि मला असे नैसर्गिक फोटो digitalली alter करू सुद्धा वाटत नाहीत. एकदा फोटो edit केला की त्यात काही मजा राहत नाही आणि तो फोटो original सुद्धा रहात नाही.

%d bloggers like this: