Home

Please, Listen Me…..

2 Comments


ऐकेल कोणी मला? (Original Image)

ऐकेल कोणी मला? (Original Image)

ऐकेल कोणी मला? (Altered Image)

ऐकेल कोणी मला? (Altered Image)

“असं म्हणतात की प्रत्येक कथा ही वेदनेतून जन्म घेते. मग मी माझी कथा अशीच मांडावी का? ऐकेल कोणी मला?”

अशाच एका वळणावर हा जीर्ण वृक्षं जणू आपली व्यथा जाण्या येणाऱ्या प्रवाशाला सांगू पहात होता.

ही वाट कुठे जाते?

Leave a comment


ही वाट कुठे जाते? (Original Image)

ही वाट कुठे जाते? (Original Image)

ही वाट कुठे जाते? (This image is digitally altered.)

ही वाट कुठे जाते? (This image is digitally altered.)

29 जून 2014 रोजी काढलेला हा फोटो आहे. दुपारी 3 वाजता सुद्धा मनात धडकी भरविणारा सह्याद्री, गच्च भरलेले आकाश,मध्येच बरसणारा बेधुन्द पाऊस, आणि यात आम्हा सहाजणांचा थवा राजगडाच्या पायथ्याशी विहंगत होता. कुठूनही समजत नव्हते की नेमका राजगड कुठे आहे आणि किती दूर आहे. त्याने स्वताला ढगांच्या रजईत लपेटून घेतले होते. फक्त साथीला होती ती मरळलेली पायवाट. पुढे तिनेही साथ सोडली आणि आमचा प्रवास चालू झाला तो एका निसरड्या वाटेवरून.

या फोटोत दिसणारी लाल पाटी ही शेवटची खूण जिन्हे आमची वाट बरोबर असल्याची खात्री दिली. गावात एकाने सांगितले होते की वर खूप पाऊस आहे आणि जपून जा कारण वाट खूप निसरडी आहे. निसरडी वाट म्हणजे काय याचा अनुभव अजुन घ्यायचा होता. आणि या जंगलात घुसल्यावर समजनार होते की नुसतीच वाट निसरडी नाही आहे तर बरोबर आमच्या साथीला भरपुर डास आणि किडे ही असणार आहेत. पण माणूस नावाचा प्राणी आम्हाला पुढे कुठेच जाताना आणि गड उतरताना ही दिसणार नव्हता. तो दिसला फक्त गडावर आणि गावात. हाच क्षण होता की जिथे आम्ही शेवटचे फोटो सेशन केले. आणि जिथे आम्हाला आमचे मोबाइल नेटवर्क साथ सोडून गेले. कारण पुढे पावसाने आम्हाला तशी संधीच दिली नाही. बहुतेक त्याच्या मनात असावे की शिवकालीन लोक कसे राहात असतील आणि कसे लढत असतील हे आम्हाला समजावे ज्यानेकरून आम्ही नवी पिढी स्वराज्याचे मोल जांणू शकू. राजगड ही 22 वर्ष राजधानी का होती ते आज आम्हाला समजणार होते. त्याची  ही फक्त चुणूक होती. शेवटी विचार न करता एकदाचे घुसलो या हिरव्या काळ्या जंगलात, हो हे जंगल मध्येच काळे दिसत होते आणि सुरू झाला आमचा पुढचा थरार……!